धाराशिव दि.११ प्रतिनिधी): जिल्ह्यातील जुनोनी ग्रामपंचायतीचे उपसरपंच इरशाद शेख यांनी आज पालकमंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेत पक्षात प्रवेश केला. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला त्यांचा दांडगा संपर्क, सामाजिक कार्यातली निष्ठा आणि विकासासाठीची प्रामाणिक धडपड लक्षात घेता त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना संघटनेला ग्रामीण पातळीवर निश्चितच नवं बळ प्राप्त होणार आहे, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रवेशप्रसंगी युवासेना धाराशिव लखन गायकवाड, अक्षय गरड, तसेच अॅड. तुकाराम शिंदे (राज्य आंदोलन समन्वयक व शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष) उपस्थित होते.
पक्षात प्रवेश घेतल्यानंतर इरशाद शेख यांनी शिवसेनेच्या विचारधारेनुसार जनतेची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या प्रवेशाचे मनःपूर्वक स्वागत करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहा आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सक्रिय भूमिका निभवा,” असे आवाहन केले.
इरशाद शेख यांच्या प्रवेशामुळे जुनोनी परिसरात तसेच संपूर्ण धाराशिव तालुक्यात शिवसेनेच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

