Advertisement

देशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात स्फोट

प्रजापत्र | Monday, 10/11/2025
बातमी शेअर करा

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एकच्या बाहेर पार्किंगमध्ये हा मोठा स्फोट झाला आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झालाय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आज फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केल्यानंतर आज संध्याकाळी दिल्लीत स्फोट झाला आहे. त्यामुळे या घटनेमागे दहशतवाद्यांचा हात आहे का? ते अद्याप समजू शकलेलं नाही. एका इको व्हॅनमध्ये हा स्फोट झाला. दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी ही स्फोटाची घटना घडली. स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. या आगीत अनेक गाड्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement