बीड दि.५ (प्रतिनिधी):पाटोदा पोलीस(Police)ठाण्याच्या हद्दीत एका मेंढपाळचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवार (दि.५) रोजी पहाटे घडली आहे. आरोपी फरार झाला असून घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड आणि(Crime) त्यांच्या टीमने धाव घेतली असल्याचे कळते.
रायमोह पोलीस (Police)चौकी अंतर्गत असलेल्या दगडवाडीमध्ये दीपक केरा भिल्ला (बऱ्हानपूर, मध्यप्रदेश) या मेंढपाळचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली असून आरोपी फरार झाल्याचे कळते. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करीत असून मागच्या काही दिवसांत (Beed)बीड जिल्ह्यात खुनाचे प्रकार वाढले असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा