तलवाडा दि.२(वार्ताहर): गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील सीआयएसएफ जवानाने मुंबईतील मुख्यालय बिल्डींगमधील खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७.३० च्या सुमारास उघडकीस आली. या बाबतची माहिती माहीम पोलीस ठाण्याने तलवाडा पोलीसांना कळवली आहे.
गेवराई तालुक्यातील तलवाडा रामनगर येथील रहिवाशी विष्णू जिजाबा गर्जे यांचा मुलगा अशोक विष्णू गर्जे (वय ३६) हा सीआयएसएफमध्ये नौकरीस असून सध्या तो माहिम। पोलीस ठाणेअंतर्गत सीआयएसएफ ओएनजीसी मुख्यालय मुंबई येथे राहत होता. आज सकाळी अशोक गर्जे (वय ३६) यांनी सीआयएसएफ ओएनजीसी मुख्यालयाच्या बिल्डींगमधील खोली
क्रमांक २२ मध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत माहीम पोलीस ठाणे मुंबई यांनी तलवाडा पोलीसांना कळविले आहे. दरम्यान अशोक गर्जे यांच्या वडिलांना व कुटूंबियांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. त्याअनुषंगाने वडिल विष्णू गर्जे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यामार्फत माहिम पोलीसांना अशोकचा मृतदेह माझा भाच्चा दत्तात्रय नाकाडे जो चेंबूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असून याच्या ताब्यात देण्यात यावा याबाबत नाहरकत पाठवले आहे. कायदेशिर प्रक्रिया पुर्ण होताच अशोक गर्जे यांचा मृतदेह तलवाडा येथे आणण्यात येणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.