Advertisement

नेकनूर जवळ बसचे दोन्ही चाके पडले निखळून 

प्रजापत्र | Saturday, 26/07/2025
बातमी शेअर करा

नेकनूर दि.२६ (वार्ताहर): छत्रपती संभाजीनगर-लातूर ही महामंडळाची(Bus) बस लातूरच्या दिशेने जात होती. बीड(Beed) तालुक्यातील मांजरसुंबा आणि नेकनूरच्या दरम्यान दुपारी पोहोचली असता अचानक मागच्या बाजूचे दोन टायर (Accident)एक पूर्वेला तर दुसरे पश्चिमेला निघून पडल्याची घटना आज शनिवार (दि.२६) रोजी दुपारी घडली. 
     मांजरसुंबा-नेकनूर(Neknoor) दरम्यान छत्रपती संभाजीनगर,लातूर बस क्रमांक एमएच २४ ययु ८३३५ या महामंडळाच्या एसटी बसचे दोन चाकं निखळुन पडल्याची घटना शनिवार (दि.२६) रोजी दुपारी घडली असून लातूर बस्थानकाचे भंडेराव सदाशिव चिवरे या चालकाच्या प्रसंगावधानामुळे ७० प्रवाशी बचावले.
 यादरम्यान मोठा अपघात झाला असता मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणत थांबवली. टायर निखळून पडले त्यावेळेला बस मधून ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर प्रवाशांनी चालकाचे आभार मानले. मात्र भंगारात घालण्याची वेळ आलेल्या अनेक(Bus accident) बसेस रस्त्यावर धावत असल्याने शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत.

Advertisement

Advertisement