Advertisement

अडीच हजारांची लाच घेताना तलाठ्यासह खाजगी इसमास अटक

प्रजापत्र | Wednesday, 23/07/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.२३ (प्रतिनिधी)ः सात बार्‍यावरील बोजा कमी करण्यासाठी शेतकर्‍याकडून ३ हजाराच्या लाचेची मागणी करत अडीच हजार रूपयांची लाच घेताना तालुक्यातील डोईठाण येथील तलाठी अशोक सुडके आणि खाजगी इसम बाबूराव क्षीरसागर यांना बुधवारी एसीबीने अटक केली.
आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील तलाठी (ग्राममहसुल अधिकारी) अशोक सुडके हा सात बार्‍यावरील वडीलांच्या नावे असलेली बोजाची नोंद कमी करून स्वतःच्या जमीनीचा फेरफार करण्यासाठी 3 हजाराची लाच मागत असल्याची तक्रार शेतकर्‍याने केली होती. या संदर्भात सदरील शेतकर्‍याने बीडच्या एसीबी कार्यालयाला संपर्क साधल्यानंतर एसीबीने तलाठी सुडकेच्या आष्टी येथील कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार बुधवारी तक्रार दाराकडून अडीज हजाराची लाच घेताना तलाठी सुडके आणि खाजगी इसम बाबूराव क्षीरसागर या दोघांना पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक राहूलकुमार भोळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समाधान कवडे, सपोउपनी सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडूकर काचकुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, अविनाश गवळी, अमोर खरसाडे, प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी आदींनी केली.

Advertisement

Advertisement