चकलांबा दि.२९(वार्ताहर):पोलीस (Beed)अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले असून चकलांबा पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केली आहे.जुगार अड्डे,वाळूचे टॅक्टर,हायवा ताब्यात घेण्याची (Criem news)कारवाई केल्यानंतर आता एका कारमधून गुटख्याचे पोते पोलिसांनी सापळा रचून शनिवार (दि.२८)रोजी रात्री ताब्यात घेतले.यात ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गुटख्याची वाहतूक होणार आहे.त्यानुसार नगर -बीड यांच्या सीमेवर असणाऱ्या घोगस पारगाव येथे सापळा रचून अंधारात वाट बघत बसलो संशयित वाहन येताच तात्काळ रस्त्यावर बॅरिगेट्स आडवे लावून सदरचे वाहन अडविले व त्याची तपासणी केली असता कार क्र.चक १२ टथ २१६२ मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याचे चार मोठे पोते आढळून आले आहेत.याप्रकरणी गाडी चालक शिवाजी मारोती बटुळे रा.भारजवाडी ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत ४ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपअधीक्षक श्री.राजगुरू यांच्या(Beed) मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील,किरण मिसाळ,प्रशांत घोगडे,अर्जुन थापडे,श्री.खटाने यांनी केली आहे.

बातमी शेअर करा