Advertisement

बदलीसाठीची २० शिक्षकांची कागदपत्रे चुकीची

प्रजापत्र | Saturday, 28/06/2025
बातमी शेअर करा

बीड -बीड जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांमध्ये संवर्ग १ चा लाभ उठविण्यासाठी बोगसगिरी होत असल्याचे वृत्त यापूर्वी अनेकदा दिले होते, आता तब्बल २० शिक्षकांची संवर्ग १ साठी दिलेली कागदपत्रे चुकीची , संशयास्पद असल्याची माहिती बीड जिल्हापरिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान यांनी दिली.
           राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्या सुरु असून या बदली प्रक्रियेत संवर्ग १ मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सवलत मिळते. त्यासाठी बनावट कागदपत्रे आणि बोगसगिरी केली जात असल्याचे वृत्त यापूर्वी प्रजापत्र ने दिले होते. आता जिल्हापरिषदेचे नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी जतीन रहेमान यांनीच याला पुष्टी दिली आहे. संवर्ग १ च्या संदर्भातील तब्बल २० शिक्षकांची कागदपत्रे संशयास्पद आणि चुकीची असल्याचे समोर आले असून त्या शिक्षकांची नावे संवर्ग १ मधून वगळण्यात आल्याचे जतीन रहेमान म्हणाले.

व्हावी फौजदारी कारवाई
 राज्यात संवर्ग  चा लाभ घेण्यासाठी बोगसगिरी सुरु असल्याने राज्य शासनाने मागच्या आठवड्यात असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश दिले होते. विशेष म्हणजे अशी कारवाई करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे निर्देश देखील शासनाने दिले होते. त्यामुळे आता या चुकीची कागदपत्रे देणाऱ्या २० शिक्षकांवर गुन्हे दाखल होतात का शिक्षण विभाग नेहमीप्रमाणे यांना पाठीशी घालतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

 

Advertisement

Advertisement