बीड-येथील शैक्षणिक संकुल समजल्या जाणाऱ्या उमाकिरणमध्ये (Beed Umakiran) अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी दोन शिक्षकांवर (Two Teachers) गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथके रवाना (Police teams have been dispatched) झाली असून दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.दरम्यान याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Women Commission) गंभीर दखल घेतली असून उमाकिरणची इमारत सील करणे आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे निर्देश (Shivajinagar Police Beed) शिवाजीनगर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहेत.त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीड शहरातील एका अल्पवयीन मुलीला कपडे काढायला लावून तिला गुड टच,बॅड टच करत तिचे फोटो काढण्यात आले होते.तसेच तिच्या शरीराशी आरोपींची असभ्य वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले होते.या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली.शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी चार पथके रवाना झाली आहेत.अजून एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही.दरम्यान आता महाराष्ट राज्य महिला आयोगाने याप्रकारची गांभीर्याने दखल घेत उमाकिरणचे आरोपी निश्चित होईपर्यंत सदर क्लासेसची इमारत सील करण्याचे निर्देश दिले आहेत.याशिवाय सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात यावे असेही पत्रात म्हटले आहे.शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांना याबाबत आदेश देण्यात आल्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा