Advertisement

पोहण्यास गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यु

प्रजापत्र | Monday, 09/06/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.९(प्रतिनिधी): तालुक्यातील मायबा सावरगाव येथे देवदर्शनासाठी आलेला तरूण मित्रांसह तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र, अचानक दम लागल्याने तरुण तलावात बुडाल्याची घटना आज, सोमवारी (दि.९) दुपारी १ च्या सुमारास घडली. गोकुळ सावंत गडरी (२२, रा. मेहुनबार ता.चाळीसगाव, जि. जळगाव) असे तरुणाचे नाव आहे.

             चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबार येथील ओंकार गडरी हा तरूण मित्रांसह सोमवारी सकाळी आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे देवदर्शनासाठी आला होता. या परिसरातील तलाव पाहून दुपारी एक वाजता ओंकार इतर मित्रांसोबत पोहण्यासाठी उतरला. पोहताना अचानक ओंकार पाण्यात गंटागळ्या खाऊ लागला. दम लागत असल्याने तो पाण्यात बुडू लागल्याचे लक्षात येताच मित्रांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. आसपासचे लोक धावून आले आणि वाचविण्यासाठी पाण्यात उड्या उतरले. मात्र, अद्याप ओंकारचा शोध लागला नाही.माहिती मिळताच घटनास्थळी आष्टी तहसिलदार वैशाली पाटील यांनी स्वतः भेट घेत पाहणी केली. सावरगाव येथील तरुण पाण्यात उतरून त्याचा शोध घेत आहेत. मात्र त्यांनाही यश आले नव्हते. घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नामदेव सातव पोलिस अंमलदार कृष्णा लव्हारे, होमगार्ड नवनाथ बोडखे आहेत.

Advertisement

Advertisement