बीड-येथील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांची बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उस्मान शेख धाराशिववरून परळीच्या संभाजी नगर पोलीस ठाण्यात रुजू झाले होते.त्यानंतर संतोष साबळे यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली. मात्र बीड जिल्ह्यात खाकीच्या कर्तव्यावर चर्चा सुरु असताना उस्मान शेख यांच्या बाबतीत ही तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः आपल्या बदलीची विनंती केली होती. त्यानुसार उस्मान शेख यांची लातूरच्या प्रशिक्षण केंद्रावर बदली झाली असून त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बातमी शेअर करा