Advertisement

महिलेचे दागिने लांबविले 

प्रजापत्र | Tuesday, 20/05/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२०(प्रतिनिधी):शहरातील(Beed) जुना नगर नाका परिसरातील साई मेडिकल या ठिकाणाहून जात असताना महिलेच्या गळ्यातील (Crime)सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात महिलांनी लंपास केल्याची घटना (दि.१८)रविवार रोजी घडली.एकूण ७४,७०० रुपयांचा एवज लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

      बीड (Beed)शहरातील रहिवाशी असलेल्या मंगल यशवंतराव टाक (वय ५६) रा.आदर्श गणेश नगर, जुना नगर नाका साई मेडिकल या ठिकाणाहून जात होत्या.जात असताना गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात महिलांनी लंपास केल्याची घटना (दि.१८)रविवार रोजी घडली. महिलेचे ७२ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण (Crime)व इतर दागिने नगदी १७०० रुपये असा एकूण  ७४,७०० रुपयांचा एवज चार अनोळखी महिलांनी लंपास केला . गर्दीचा फायदा घेऊन हे दागिने चोरले आहे. आपले दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने शिवाजीनगर पोलिस (Beed police)ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement