नेकनूर दि.१७(वार्ताहार): शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ स्मारक उभारण्यासाठी नेकनूर ग्रामपंचायत मार्फत जागा देण्यात यावी या मागणीसाठी नेकनुरकर आक्रमक झाले आहेत (दि.१७) शनिवार रोजी सकाळी १० वाजल्यापासून अजयसिंह काळे हे या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.
बीड तालुक्यातील नेकनूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वरूढ स्मारक उभारण्यासाठी नेकनूर ग्रामपंचायत मार्फत जागा देण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बीड व नेकनूर ग्रामपंचायत कार्यालय यांना वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे अजयसिंह भारतराव काळे हे व समस्त शिवप्रेमी नागरिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर (दि.१७) शनिवार रोजी सकाळी १० वाजल्यापासून या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत.अजूनपर्यंत ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही.

बातमी शेअर करा