Advertisement

सहाल चाऊस यांना धक्का ? काय आहे प्रकरण ? माजलगावच्या नगराध्यक्षपदाचे काय झाले ?

प्रजापत्र | Tuesday, 30/06/2020
बातमी शेअर करा

बीड  : मागील तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस हे नगराध्यक्ष असणे बंद झाल्याचे निरीक्षण नोंदवत माजलगावचे नगराध्यक्षपद रिक्त झाल्याची घोषणा बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली आहे. सहाल चाऊस यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे. सहाल चाऊस हे थेट जनतेततून निवडून आलेले नगराध्यक्ष असून भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 


माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरोधात माजलगाव नगर पालिकेतील नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असतानाचाच, नगराध्यक्ष सलग ३ महिने गैरहजर असल्याची याचिका  जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. यात सहाल चाऊस हे मागील ३ महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असून नगर पालिकेचा कारभार पाहत नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या नंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार नगराध्यक्ष सलग तीन महिने गैरहजर असतील तर ते नगराध्यक्ष राहत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे माजलगावचे नागराध्यक्षपद रिक्त झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली असून यामुळे सहाल चाऊस यांचे नगराध्यक्षपद संपुष्टात आले आहे. भाजपचे नगराध्यक्ष असलेल्या चाऊस यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते. चाऊस यांच्या विरोधात माजलगावचेआमदार प्रकाश सोळंके यांनी देखील आघाडी उघडली होती. 

Advertisement

Advertisement