Advertisement

कांदा काढणीला निघालेल्या मजुरांचा पिकअप पलटला

प्रजापत्र | Thursday, 01/05/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.१ (प्रतिनिधी): तालुक्यातील धामणगाव येथे कांदा काढण्यासाठी निघालेल्या महिला मजुरांच्या पिकप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यु झाला असून १५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत .हा अपघात बीड अहिल्यानगर महामार्गावरील धामणगाव परिसरात झाला .कामगार दिनाच्या दिवशी कांदा काढण्यासाठी जाणाऱ्या अपघातात महिला मजुरांच्या मृत्यूमुळे  मोठी खळबळ उडाली होती . अपघात घडल्याचे समजतात पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले .जखमींना रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात आली . (Beed Accident)  गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान अपघात घडलाय.

Advertisement

Advertisement