Advertisement

डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न

प्रजापत्र | Wednesday, 23/04/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.२३(प्रतिनिधी): तेलगाव (Majlagav)रोड वरील महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या शोरूम समोर एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून जिवंत(Crime) मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना (दि.२३) रोजी घडली असून जखमींची प्रकृती गंभीर असून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

       

 

 

    अधिक माहिती अशी की, तेलगाव रोड वर असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्स शोरूमकडे(Crime news) दोन व्यक्ती मध्ये कुरबुर सुरू होती ही कुरबुर वाढून आलेल्या रागातून सदरील इसमाने उत्तम बाबासाहेब विघ्ने रा.लउळ यांच्या डोक्यात दगड घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला सदर इसम हा तिथून पसार झाला असून जखमी विघ्ने वर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे . माजलगाव मध्ये कायद्याच्या धाक हा पूर्णतः संपला असून गेल्या पाच दिवसात दोन(Beed police) खुनाच्या घटना ताज्या असताना आज या घटनेने पुन्हा एकदा माजलगाव शहर हादरले आहे.घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement