Advertisement

जन्मदात्या पित्यानेच केला मुलीवर अत्याचार

प्रजापत्र | Tuesday, 15/04/2025
बातमी शेअर करा

नेकनूर दि.१५(वार्ताहर):बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस(Beed police) ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवार रोजी घडली होती. या प्रकारणात(Crime) आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

       नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका(Crime news) गावातील दाम्पत्यामध्ये घरगुती कारणावरून वाद निर्माण झाले होते. या वादातून आरोपीची पत्नी पुण्याला निघून गेली होती.तर मुलगी एकटी घरी होती.शुक्रवारी रात्री राहत्या घरातच नराधम पित्याने पोटाच्या मुलीवर अत्याचार केला. सदरील प्रकार हा मुलीची आई पुण्यावरून आल्यानंतर समोर आला. पिडीतेच्या आईने याबाबत आज नेकनूर पोलीस ठाण्यात जावून नराधम पित्या विरोधात (Beed police) तक्रार दाखल केली त्यानुसार आरोपीविरोधात बाल लैगिंक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सध्या नराधाम आरोपी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आहे.या घटनेमुळे नेकनूर परिसरात खळबळ उडाली.

Advertisement

Advertisement