Advertisement

महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसृष्टीवर अलोट गर्दी 

प्रजापत्र | Monday, 14/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१४(प्रतिनिधी): भारतीय घटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज(Beed) शहरातील भीमसृष्टी येथे महामानवाला अभिवादन करण्यासठी अलोट गर्दी झाली होती. पहाटेपासून लहान, थोर भीमसैनिकांनी उपस्थित लाभल्याने येथे निळे बाद आल्याचे चित्र दिसून आले सकाळीच आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,मनोज जरागे यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

   यावेळी जिल्हाभरातील भीमसैनिकांची (Beed)मोठी उपस्थिती होती. सोमवारी (दि.१४) सोमवार रोजी सकाळी ८ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भीमसैनिकांनी भीमसृष्टी पर्यंत अभिवादन रॅली काढली. येथे पोहोचल्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.(Beed)यानंतर अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी रिपाईचे पप्पू कागदे, माजी आ.सय्यद सलीम, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, अशोक हिंगे, शुभम धुत, योगेश क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, सलीम जहांगीर यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement