बीड दि.११(प्रतिनिधी):शहरातील (Beed)मित्र नगर परिसरातील गुडलक हॉटेल समोरून अज्ञात चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतील १,५०००० रुपये लंपास केल्याची घटना (दि.९) बुधवार रोजी दुपारी १२.५२ ते २ च्या सुमारास घडली (Crime)असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आण्णा दशरथ खोसे (वय ४१) रा.गणेश अपारमेन्ट धांडे नगर बीड हे शहरातील मित्र नगर येथील मानसी मॉलच्या समोर रोडवर दुचाकी उभी करून चहा पिण्यासाठी (Beed)गुडलक हॉटेलमध्ये गेले असता थोड्या वेळाने परत आल्या नंतर डिक्की मध्ये पहिले तर डिक्कीमधील १,५०००० रुपये अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याचे निदर्शनात आले.आण्णा खोसे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास (Beed police)पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा