गेवराई दि.११ (प्रतिनिधी):तालुक्यातील देवकी विठ्ठलनगर फाटा येथील (Beed) रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी मिळताच (दि.१०) गुरुवार रोजी कारवाई करत ४,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Georai)करण्यात आला आहे.
गेवराई (Georai) तालुक्यातील देवकी विठ्ठलनगर फाटा येथील शहागड कडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक करताना सचिन रघुनाथ धनगर (वय.३०)रा.बेलगाव ता.गेवराई जी.बीड यांच्यावर गेवराई पोलिसांनी कारवाई केली यात जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर क्र. एमएच २३ एजे २०७४ व एक विना नंबरची ट्रॉली दोन्हींची अंदाजे किंमत ४,००,००० व एक ब्रास वाळू किंमत ६००० रुपये असा एकूण ४,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास गेवराई(Georai police) पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा