Advertisement

 देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाची दुचाकी लंपास

प्रजापत्र | Friday, 21/03/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.२१ (प्रतिनिधी): तालुक्यातील(Ashti) मच्छिद्रनाथगड मायंबा सावरगाव येथे गेले असता तेथून (Beed)अज्ञात चोरटयांनी दुचाकी लंपास केल्याची घटना (दि.१९) बुधवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा(Beed police) दाखल करण्यात आला आहे. 

            आष्टी (Ashti) तालुक्यातील मच्छिद्रनाथगड मायंबा सावरगाव येथे आदेश चंद्रकांत जाधव (वय २३)रा.दिक्षाभूमी नगर हर्सूल ता.जि. संभाजीनगर हे देवर्शनासाठी आले असता त्यांची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची दुचाकी अंदाजे किंमत २९००० क्र.एमएच २० ईपी ६१५८ अज्ञात चोरटयांनी लंपास (Crime news)केल्याची घटना (दि.१९) बुधवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement