आष्टी दि.१७ (प्रतिनिधी): तालुक्यातील (Ashti)उंदरखेल येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात (Crime news)चोरटयांनी २,९८,००० रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याची घटना (दि.१५) शनिवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा (Police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात (Beed)मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होऊ लागली अशातच(Ashti) आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथील सुनील विठ्ठल वामन (वय ३९) व यांचा मोठा भाऊ बाबासाहेब विठ्ठल वामन यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी १० ग्रॅम सोन्याची चैन किंमत २५,००० रुपये,२५ ग्रॅम सोन्याची चैन किंमत ६२,५००० रुपये ,२६ ग्रॅमचा राजीहार किंमत ६५,०००, २७ ग्रॅमचे गंठण किंमत ६७,५००,९ ग्रॅमचे साखळी (Crime)गंठण किंमत २२,५००,१० ग्रॅमची सोन्याची अंगठी किंमत २५,०००,२ ग्रॅमची अंगठी ५०००,७ ग्रॅमचे कानातील झुंबर व वेळ किंमत १७,५०० व रोख रक्कम ८००० रुपये असा एकूण २,९८,००० रुपयांचा मुद्देमाल पसार केल्याची घटना (दि.१५) शनिवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (Beed police)आहे.अधिक तपास अंभोरा पोलीस करत आहेत.