Advertisement

सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर

प्रजापत्र | Thursday, 13/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी): (shirur kasar)गरीबाला अमानुष मारहाण करत दहशत माजवणारा गुंड (Satish Bhosale)सतीश भोसले उर्फ खोक्याचाच आता माज उतरवला आहे. खोक्याच्या बेकायदा घरावर वनविभागानं बुलडोझर फिरवला आहे.(beed)वनविभागानं ही बेधडक कारवाई करून खोक्याची दहशत एकप्रकारे मोडून काढली आहे.

शिरूर कासारपासून काही अंतरावर असलेल्या तहसील समोर वन (Beed news)विभागाच्या जागेत त्याचं राहत घर आहे. बुलडोजर फिरवण्याआधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घराची झडती घेतली होती. त्याच्या घरातील सामान काढले नंतर त्याच्या बेकायदेशीर घरावर बुलडोजर फिरवला.वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधल्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे. वन विभागाचे अधिकरी आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने सतीश भोसलेच्या घरावर कारवाई करण्यासाठी आले आहेत.

Advertisement

Advertisement