बीड दि.३ (प्रतिनिधी):शहरातील (Beed)नेहरूनगर मधील एक कुटूंब देवदर्शनसासाठी गेले असता त्यांचा घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरटयांनी २,५७५०० रुपयांचा मुद्देमाल (Crime)लंपास केल्याची घटना (दि.१८ फेब्रुवारी ते दि.१ मार्च)दरम्यान घडली असून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (Beed police)दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी कि,(Beed)शहरातील नेहरूनगर येथील रहिवाशी रमेश नरसिंगराव त्रीमुखे हे कुटूंबासोबत देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरटयांनी घराचा दरवाजा तोडून कपाटामध्ये ठेवलेले दोन तोळ्याचे लॉकेट किंमत ८००००,पर्समध्ये ठेवलेले रोख ३५,०००,तीन तोळ्याचे गंठण किंमत १२००००,चांदीची फ्रेम २५०० तसेच कानातले ५ ग्रॅम किंमत २०००० असा एकूण अंदाजे २,५७५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास(Crime news) केल्याची घटना (दि.१८ फेब्रुवारी ते दि.१ मार्च) दरम्यान घडली असून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास (Beed police)बीड शहर पोलीस करत आहेत.