Advertisement

तिंतरवणीत फोडले कपड्याचे दुकान  

प्रजापत्र | Friday, 28/02/2025
बातमी शेअर करा

चकलंबा दि.२८ (वार्ताहर): शिरूर कासार (shirur kasar)तालुक्यातील तिंतरवणी येथील कपड्याचे दुकान अज्ञात (crime news)चोरट्याने (दि.२४) सोमवार रोजी फोडले असून १,६०,०००  रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे अज्ञात चोरट्याविरुद्ध (Chaklamba Police Station) चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . 

                 अधिक माहिती अशी कि,अजिनाथ शिवाजी खेडकर (वय ३०) यांच्या (Chaklamba Police) चकलंबा रोडवर असलेल्या पांडुरंग या कपड्याचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील ४५,००० रुपये रोख व १,१५,००० रुपयांचा (beed)कपड्यांचा माल त्यामध्ये साड्या,लहान मुलांच्या जीन्स पॅन्ट,शर्ट इत्यादी असा एकूण १,६०,००० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना (दि.२४) सोमवार रोजी घडली (crime news)आहे.अज्ञात चोरट्याविरुद्ध चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .अधिक तपास चकलंबा(Beed police) पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement