धाराशिव- एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद होणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांन दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं राज्याचे परिवहन मंत्री (pratap sarnaik )प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
पत्रकारांना एसटी (ST)प्रवासात सवलत मिळावी अशी मागणी पत्रकारांनी यावेळी केली. यावर बोलताना प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की, सरकारकडून महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत देण्यात आली आहे. महिला आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी महामंडळाला फटका बसत आहे. एसटीला दररोज ३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. (ST Corporation)त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. महिलांना एसटी प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्क्यांची सवलत मिळते. तर ज्येष्ठ नागरिकांना तर एसटीचा प्रवास मोफत आहे. मात्र परिवहन मंत्र्यांना केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याच शक्यता आहे.