मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेतलं असून ते मुंबईकडे निघाले आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान (Eknath Shinde)संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतल आहे.

बातमी शेअर करा