Advertisement

पोलीस अधिकारी फोन घेत नाहीत,काळजी करू नका.. 

प्रजापत्र | Thursday, 13/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी)- (Beed police)पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी (beed)जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे.याच उपक्रमाचा आणखी एक भाग म्हणजे आता प्रभारी अधिकाऱ्यांना जनतेसोबत थेट संपर्क असायला हवा आणि त्यासाठी शासकीय क्रमांक जारी करण्यात आले.अधिकाऱ्यांची बदली झाली तरी तोच क्रमांक संबंधित ठाणे व नवीन अधिकाऱ्यांकडे यापुढे राहणार आहे.त्यामुळे आता या क्रमांकावर (numbers)अवैध धंदे,गुन्ह्याची माहितीसह गुप्त माहिती देणे सोईचे होणार असून हे नंबर (whatsapp)व्हाटसअँपवर देखील राहणार आहेत.त्यामुळे अधिकारी त्यांचे खाजगी क्रमांक उचलत नसणाऱ्या त्रस्त (citizens)नागरिकांना आता या क्रमाकांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  
   पोलीस (Beed police)अधिक्षक नवनीत कॉवत यांनी काही दिवसांपूर्वी जनतेसोबतच संपर्क वाढला पाहिजे यासाठी संवाद (app)अँप आणले. या अँपमुळे काल रात्री धर्मापुरीत साडेतेरा लाखांचा गुटखा पकडण्यात आला. संवाद अँपमुळे (beed)जिल्ह्यातील जनतेला खाकीबद्दल विश्वासाच्या भावना दृढ झाल्यानंतर आता एसपींनी आणखीन कौतुकास्पद पाऊल टाकले आहे.पोलीस अधिक्षक,अप्पर पोलीस अधिक्षक,पोलीस उपाधीक्षक यांच्यासह प्रभारी अधिकाऱ्यांना शासकीय क्रमांक देण्यात आले.यावर कधीही संपर्क करता येणार असून (24 taas)२४ तास हे क्रमांक जनतेसाठी उपल्बध राहणार आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement