Advertisement

धर्मापुरीत १४ लाखांचा गुटखा पकडला 

प्रजापत्र | Thursday, 13/02/2025
बातमी शेअर करा

परळी दि.१३ (प्रतिनिधी) : (parali police)तालुक्यातील धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी छापा टाकून १४ लाख रुपये किमतीचा तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा (दि.१२) रोजी रात्री जप्त केला आहे. (crime news)जप्त करण्यात आलेल्या गुटक्याची अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी  हे  तपासणी करून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे  पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले. 

धर्मापुरी (Dharmapuri) येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याचे माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे,  पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख लाल, निमोणे, विष्णू घुगे, पांडुरंग वाले ,गोविंद बडे सुनील अन्नमवार यांच्या पथकाने (दि.१२) फेब्रुवारी रोजी रात्री या किराणा दुकानावर छापा टाकला. यावेळी शासनाची बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येथे आढळून आले. याची किंमत अंदाजे १४ लाख रुपये आहे. हा सर्व गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणारे दोघेजण असून त्यांच्या  विरोधात गुरुवारी रात्री परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

 सदरची कारवाई सय्यद मजहर (beed police)पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणे,ए.एस,आय,कवडे,पी,एस,आय,निमोणे,पी,एस.आय.शेख, सुंदर केंद्रे,पांडुरंग वाले,विष्णु घुगे,तुळशीराम परतवाड,सुनिल अन्नमवार,शंकर वाघमारे,अश्रुबा नागरगोजे,महादु गित्ते, किशोर गायकवाड, आदिनाथ डापकर, विकास गडदे,पुरी मॅडम, गणेश दहिफळे,सोपान दहिफळे,नितीन होळंबे,मानाजी मुंडे यांनी केली. अधिक तपास पोलीस करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement