बीड दि.१२(प्रतिनिधी): (Beed)येथील नगरपरिषदेने बुधवारी (१२) शहरातील अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा मारुन अतिक्रमण काढून टाकली आहेत. हातावर पोट असलेल्या छोट्या (Shop)दुकानदारांनी टाकलॆल्या पत्र्याच्या टपऱ्या या मोहिमेत काढून घेण्यात आल्या. यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे देखील सांगितले जाते. अतिक्रमण हटाव मोहीम नगरपालिका राबविणार असेल तर त्याचे स्वागतच , पण पोटार्थ्यांची अतिक्रमणे काढताना,(Beed) बीडमध्ये ज्या बिल्डरांनी नदी, नाले गिळंकृत करून मोठमोठ्या इमारती नदीपात्रात, पूररेषेत बांधल्या आहेत, ओपन स्पेस अतिक्रमण करून ढापले आहेत , त्या अतिक्रमणाकडे नगरपालिकेची नजर कधी वळणार आहे का नाही असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.
शहरातील स्वच्छता, पाणी आणि धुळीचा गंभीर प्रश्न असून, यामुळे शहरातील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. पण याबाबत झोपेचं सोंग घेणारी (Municipal council) नगरपरिषद आज अचानक जागा झाली आणि शहरातील रस्त्यांवर लहान सहान व्यवसाय करणाऱ्यांचे चहाच्या टपऱ्या, पान टपऱ्या सह इतर व्यावसायिक पोटभरत होते.
यामुळे वाहतुकीस अडथळा आणि शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने बुधवारी ( दि.१२) नगरपरिषदेने कारवाई करीत (Bulldozer Action) बुलडोझर लावून अतिक्रमण पाडण्यात आली. याची सूचना मंगळवारी (दि.११) नगरपरिषदेने शहरात अतिक्रमण काढून घेण्याचे लाऊडस्पिकरच्या माध्यमातून दिली होती. ज्यांनी अतिक्रमण काढले नाही अशा काही व्यसायीकांचे हातगाडे आणि टपाऱ्या तोडण्यात आल्या आहेत. ही मोहीम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कारंजा रोड, नगर रोड तसेच जालना रोडवर राबविण्यात आली. इतरही भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त होणार असतील तर त्याचे स्वागतच, मात्र हे करताना कायद्याचा धाक केवळ गोरगरिबांनाच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड शहरात मागच्या काही वर्षात(Municipal council) नगरपालिकेच्याच दुर्लक्षामुळे ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. (Bindusara)बिंदुसरा आणि कर्परा नदीच्या पूररेषेसोबतच अगदी नदी पात्रात देखील बांधकामे झाली आहेत, ओढ्यामध्ये भराव घालून ते विकले गेले आहेत, त्यावर मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. पार्किंग साठीच्या जागा ढापून त्यावर अतिक्रमण झाले आहे. शहरातील ओपन स्पेस गायब असून त्यावर देखील सर्रास अतिक्रमण झाले आहे. बरे हे अतिक्रमण करणारे काही डोक्यावर दोन पत्र्यांचे देखील छप्पर नाही, म्हणून आसरा शोधायचा म्हणून केलेले अतिक्रमण नाही, तर बिल्डर लॉबीमधल्या धनदांडग्यांनी प्रशासनातील लोकांना हाताशी धरून हे अतिक्रमण केले आहे, आणि त्यावर कोट्यधीची माया जमविली आहे. नगरपालिकेला खरोखर कायद्याची काही चाड असेल तर या धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रेमनाकडे देखील नगरपालिकेने लक्ष द्यावे आणि त्या अतिक्रमणांना बुलडोझर नाही तर किमान हातोडा तरी दाखविण्याची हिम्मत दाखवावी अशी मागणी सामान्यांमधून होत आहे. हाच विषय घेऊन (beed)बीड शहरात डॉ . गणेश ढवळे , रामनाथ खोड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शने करून निवेदन देखील दिले आहे.
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/IMG-20250213-WA0003.jpg?itok=Ji0fqV-u)
प्रजापत्र | Thursday, 13/02/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा