Advertisement

बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य अबाधित रहावे

प्रजापत्र | Wednesday, 22/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२२ (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री (Dhananjay Munde) धनंजय मुंडे आज उपस्थित राहिले. यावेळी आपल्या (beed )बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा, अशी प्रार्थना गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (gahininath gad )येथे आज संत वामन भाऊ यांचा ४९ वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण २० ते २५ वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी (Dhananjay Munde)धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले. पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

Advertisement

Advertisement