छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका १४ वर्षीय मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी न जाता रस्त्यामध्ये कटलेला पतंग पकडण्यासाठी त्या पतंगाच्या माघे धावत सुटला. दरम्यान, पतंगीच्या दिशेने धावत असताना खाली लक्ष नसताना तिथं रस्त्याच्या कडेला असल्याले नालीमध्ये पडला. या अपघातात या मुलांचा दुर्दैव मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. पवन शांतीकुमाल राठोड असे मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मकर संक्रांतीला आता अवघे काही दिवस उरले आहे. या सणाच्या निमित्याने मोठ्या प्रमाणात पतंग उडवल्या जातात. असे असतानाच या काळात अनेक अपघात देखील घडत असतात. अशीच एक दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरच्या बाळापुर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.