मुबई- पक्षात नाराजीचा सूर आळवणाऱ्या माजी नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांसमोर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंच्या शिवसेनेत काही पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नाराजीचा सूर आळवला, पक्षात विश्वासात घेत नसल्याचं आणि योग्य मान मिळत नसल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीनंतर काही पदाधिकारी माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत. अशामध्ये माजी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून एक प्रकारे पक्षाला ब्लॅकमेल केलं जात आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नसून शिवसैनिक हा लढणारा आहे आणि जिंकणारा आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले."त्यामुळे ज्याला जायचं त्यांनी जा मी कोणाला थांबवणार नाही" शिवसैनिक लढणार आणि जिंकणार... असं स्पष्ट मत उद्धव ठाकरेंनी पधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडल्याची माहिती आहे.विधानसभा निवडणुकीनंतर काही शिवसैनिक पदाधिकारी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून गेले. त्यानंतर आता काहींनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.