Advertisement

 खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच

प्रजापत्र | Sunday, 22/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई:अखेर रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून देवेंद्र फडणवीसांनी गृह खातं स्वत: जवळच ठेवलं आहे. एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी जोर लावत असल्याची मोठी चर्चा सुरू होती. मात्र अखेर त्यांना नगरविकासासह गृहनिर्माण आणि रस्ते विकास खात्यावर समाधान मानावं लागलं आहे. खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. 

 

 

दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय खातं मिळालं आहे. मात्र त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान संभाजीनगर पालकमंत्री मीच होणार असल्याचं जाहीर करून टाकलं आहे. अद्याप तरी पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तत्पुर्वी संजय शिरसाटांनी आपण छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार असल्याचं सांगितल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. जुलै महिन्यात अब्दुल सत्तार यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं होतं. दरम्यान भाजपचे आमदार अतुल सावे देखील येथून पालकमंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचं सांगितलं जातं. 

Advertisement

Advertisement