नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यात शुल्क पूर्णपणे काढावे या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांनी आज शुक्रवार (दि.२०) रोजी संसदेत आंदोलन केले. तसेच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क केंद्र सरकारने २० टक्क्याने वाढवल्यामुळे कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या किमती घसरल्या आणि परिणामी शेतकऱ्याचे नुकसान झाले. कांद्यावरील निर्यात शुल्क हे सरकारने पूर्णपणे काढले पाहिजे, यासाठी खासदार निलेश लंके यांनी महाविकास आघाडीच्या इतर खासदारांसोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. गोयल यांना या निवेदनाचे पत्र दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकसभेच्या मकरद्वारावरही उपोषण करण्यात आले.
बातमी शेअर करा