Advertisement

 'त्यांना' कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा!

प्रजापत्र | Friday, 20/12/2024
बातमी शेअर करा

कल्याणच्या खडकपाडा परिसरातील एका सोसायटीत धूप-अगरबत्ती लावल्याच्या कारणातून अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी नोकराने साथीदारांच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात अभिजित देशमुख हा मराठी तरुण जबर जखमी झाला. या घटनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे गंभीर इशारा दिला आहे. ''कल्याण प्रकरणातील आरोपींना अटक करा, त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल, तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका.'' असे राज ठाकरे यांनी X ‍‍वर पोस्ट करत म्हटले आहे.

Advertisement

Advertisement