Advertisement

 अंतरवाली सराटीत या! मराठ्यांची लाट पुन्हा उसळणार

प्रजापत्र | Tuesday, 17/12/2024
बातमी शेअर करा

जालना - मंत्रिमंडळाचा विस्तारानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. येत्या २५ जानेवारीपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसणार आहेत. आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन नाही, तुम्हाला घरातून उपोषणास बसण्यास विरोध असेल तर बसू नका. उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितले.
 

Advertisement

Advertisement