Advertisement

बीड जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

बीड दि.१६ (प्रतिनिधी)- सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यु झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज (दि.१६) सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकर अनुयायांच्या वतीने देण्यात आली होती. बीड शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. तर  ,केज,धारूर,गेवराई,परळी अंबाजोगाई, आष्टी,पाटोदा, शिरूर आदी ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात आला.

 

परभणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ संविधान प्रेमी युवक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून काही युवकांना मारहाण केली होती. यादरम्यान, न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा कारागृहात मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज महाराष्ट्र बंदची हाक आंबेडकर अनुयायांनी दिली होती. या बंदला बीड शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व अनुयायांनी एकत्रित येत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आरोपींवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement

Advertisement