Advertisement

 सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यु कशामुळं झाला?

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

परभणीमध्ये हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलककर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. यात आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीत मृत्यु झाला होता. या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. याप्रकरणात नवी माहिती समोर आलीय. सूर्यवंशी याचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा अहवाल 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलाय. यात सोमनाथ यांच्या मृत्युचं कारण सांगण्यात आले आहे.

 

आंदोलक सूर्यवंशीचा मृत्यु मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची आज हाक देण्यात आली. बीड, परभणी, नांदेड, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये बंदला समिश्र पाठिंबा मिळालाय. दरम्यान वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सुर्यवंशी यांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट सर्वांसमोर आणलाय. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यु हा मारहाणीमुळे झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जखमा आणि अटॅकमुळे झालेला असल्याचा अहवाल छत्रपती संभाजी नगरच्या घाटी हॉस्पिटलमधून मिळाला आहे. हा अहवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय.

दरम्यान परभणीत रविवारी आंदोलनकर्ता सोमनाथ सूर्यवंशी या ३५ वर्षीय युवकाचा न्यायलीयन कोठडीमध्ये मृत्यू झाला. आज पूर्णा येथे रॅली काढत निषेध करण्यात आला. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

Advertisement

Advertisement