Advertisement

धनंजय मुंडेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा

नागपूर - महायुती सरकारचा नागपूमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची मंचावर उपस्थिती आहे . गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा आज (१५ डिसेंबर) विस्तार झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये स्थान मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत होते. जमेल त्या मार्गाने लॉबिंग करण्यााच प्रयत्न या नेत्यांकडून केला जात होता. मात्र मंत्रि‍पदांची संख्या मर्यादीत असल्यामुळे मोजक्याच नेत्यांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागली. यामध्येच बीड जिल्ह्याचे नेते आ.धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचादेखील समावेश आहे. ते विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्रिपद दिलं आहे. धनंजय मुंडे यांनी आज मंत्रि‍पदाची शपथ घेतली 

Advertisement

Advertisement