Advertisement

शेवटच्या काही तासांमध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंना फिरवला फोन

प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई -अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. आज मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. नागपूरमध्ये या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे .

एनसीपीच्या सुरूवातीच्या यादीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश नव्हता. यामुळे विविध चर्चा रंगताना दिसल्या. बीड जिल्हातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आल्याने धनंजय मुंडे यांचा पत्ताकट झाल्याची चर्चा होती. धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्या नावाचा समावेश मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत नव्हता. आता छगन भुजबळ यांचा पत्ताकट झाल्याचे कळतंयशेवटी या यादीत धनंजय मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलाय. धनंजय मुंडे यांनी परळीतून विधानसभेची निवडणूक लढवली आहे. विशेष म्हणजे अत्यंत मोठ्या मतांनी त्यांचा विजय झालाय. आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांचाही मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीत समावेश झाला आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा संभाव्य मंत्रिमंडळ यादीत समावेश असल्याने परळीत उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसची संभाव्य मंत्रिमंडळाची यादी. आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक, अजित पवार
 

Advertisement

Advertisement