Advertisement

पुष्पा २ प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

प्रजापत्र | Friday, 13/12/2024
बातमी शेअर करा

तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधील चिकलाडपल्ली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, या चेंगराचेंगरीमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला होता. तिचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.

 

 

 चिकलाडपल्ली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पुष्पा २' च्या प्रीमियरवेळी अल्लू अर्जुन आणि त्याच्या टीमने पोलीसांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. यामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.या चेंगराचेंगरीमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला होता. तिचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.हैदराबाद पोलिसांच्या सेंट्रल झोनचे उपायुक्त अक्षांश यादव यांनी सांगितले की, "या प्रकरणी बीएनएस कलम १०५ (खुनासारखे दोषी कृत्य) आणि ११८ (१) सह ३ (५) (जाणीवपूर्वक दुखापत घडवणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे."

अल्लू अर्जुनला शुक्रवारी चिकलाडपल्ली पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी सांगितले की, "या प्रकरणात दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल." मृत महिलेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement