आष्टी दि.२ (प्रतिनिधी)- तालुक्यातील चोभा- निमगाव येथील वैशाली उर्फ राणी अमोल सरोदे (वय २५ वर्ष) ही नवविवाहित महिला सकाळी शौचास आपल्या घराच्या जवळील शेतामध्ये गेली असता विहिरीच्या जवळून पुढे जात असताना विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला.
सविस्तर माहिती अशी की,शनिवार (दि.३०) रोजी वैशाली सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरातील मंडळी झोपेत असतानाच शौचास घराच्या जवळील शेतामधील विहिरीजवळून जात होती यावेळी विहिरीला संरक्षण कठडे नसल्याने विहिरीत पाय घसरून पडल्याने तीचा जागीच मृत्यु झाला. वैशाली ही बराच वेळ घरी न दिसल्याने घरातील मंडळींनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता , बराच वेळ ती मिळून आली नाही. नंतर आजूबाजूला माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला असता. घराच्या जवळील शेतामध्ये विहिरीत सकाळी ११.३० वा.
च्या दरम्यान तिचा मृतदेह सापडला. याबाबत कडा पोलीस चौकी येथे याबाबतची माहिती देण्यात आली . यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते कारण वैशालीचे आई-वडील हे कारखान्यावरती ऊस तोडणीसाठी गेले असल्याने त्यांना येण्यास उशीर झाला ते आल्यानंतर सकाळी सर्वांच्या संमतीने शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रविवारी दुपारी १.३० वा. वैशालीवर चोभा- निमगाव येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे करत आहेत.