Advertisement

 मुख्यमंत्रिपदाची घोषणा लांबणीवर

प्रजापत्र | Friday, 29/11/2024
बातमी शेअर करा

मुंबई - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे समजण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पाहाली लागेल, असं दिसतेय. कारण, मुंबईमध्ये महायुतीची आज होणारी बैठक रद्द झाली आहे. मुंबईमधील बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचे नाव निश्चित होण्याची शक्यता होती. त्याशिवाय कोणाला कोणतं मंत्रीपद दिले जाणार? हेही निश्चित होणार होतं. महायुतीमधील मुख्यमंत्रि‍पदाची पेच आणखी वाढला का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत होणारी बैठक रद्द झाली आहे. आज होणारी बैठक दोन दिवसांनी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर शिवसेना आमदारांची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आळी आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी काल रात्री अमित शाह यांच्याकडे प्रस्ताव दिले होते. त्या प्रस्तावावर विचार करून अमित शाह हे या दोन्ही नेत्यांना फोन करणार होते. त्या फोन नंतर राज्यातील तीन नेते एकत्र बसून निर्णय घेणार होते. मात्र अद्यापपर्यंत फोन न आल्याने बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जातेय. आता ही बैठक दोन दिवसानंतर होईल अशी चर्चा आहे.

Advertisement

Advertisement