आष्टी-तालुक्यातील सराटेवडगाव येथे आठवड्यापूर्वी ३०० कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली होती.पशुसंवर्धन विभागाने मृतांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते.गुरुवारी (दि.२१) याचा अहवाल आला असून यामध्ये मृत कोंबडे व कावळे बर्ड फ्लूने मेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात डॉ.मंगेश ढेरे यांनी माहिती दिली.
गेल्या आठवड्यात सराटेवडगावमध्ये ३०० कोंबड्या व कावळ्यांचा मृत्यु झाल्याने खळबळ उडाली होती.सध्या आष्टी तालुक्यात पशुसंवर्धन विभागाची पथके तळ ठोकून असून सराटेवडगावमधील अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बातमी शेअर करा