आष्टी (प्रतिनिधी)आष्टीत मुर्शदपुर भागात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना बुधवारी महिंद्र पोतदार यांच्या राहत्या घरी दुपारी ४:३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की,आष्टी शहरातील मुर्शदपुर भागातील के.के. काळे यांच्या किराणा दुकानाशेजारी राहणाऱ्या महिंद्र पंडितराव पोतदार यांच्या घराचा मेन दरवाजाचे कढीकोंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाट उचकून ३ तोळे सोने,चांदीचे भांडे व १० हजार रुपये रोख रक्कम चोरांनी लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.या घटनेच्या दरम्यान महिंद्र पोतदार यांचे वडील आतल्या रूम मध्ये झोपलेले होते.परंतु वडील वयोवृद्ध असल्याने त्यांचा हा प्रकार लक्षात आला नाही. महिंद्र पोतदार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून
सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सलीम चाऊस हे करत आहेत.
बातमी शेअर करा