बीड: कोरोनाच्या संदर्भाने बीड शहराला शनिवारी मोठा धक्का बसला असून शहरातील ७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळ्ले आहेत. या सर्व सात रुग्णांचा यापूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांशी संपर्क आलेला आहे.आजच्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे आता बीड जिल्ह्यातील कोरोनाची आकडेवारी शंभरच्या पुढे गेली आहे.
बीड शहराच्या झमझम कॉलनी भागातील २, शहेनशहा नगर भागातील १, बशीरगंज भागातील ४ व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळला आहे.शुक्रवारी बीड शहराच्या छोटी राज गल्ली भागात एक जोडपे कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते त्यांनी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात उपस्थित काही लोकांचे स्वाब घेण्यात आले होते. त्यामुळे आजचा आकडा वाढला आहे. तर धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील औरंगाबाद येथून आलेल्या एका ३१ वर्षीय महिलेसह एका आठ वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १०८ इतकी झाली आहे. यातील ७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २८ रुग्णानावर उपचार सुरु आहेत. तर चौघांचा बळी गेला आहे.