Advertisement

बीडजवळ भेसळयुक्त ऑईलचा पर्दाफाश

प्रजापत्र | Tuesday, 29/10/2024
बातमी शेअर करा

बीड-शहरपासून जवळ असणाऱ्या काकडहिरा शिवारात मागच्या वर्षभरापासून नामांकित कंपनीचे बनावट ऑईल (fake oil) तयार करण्याचा गोरखधंदा सुरु होता. याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे (Assistant Police Inspector Balraje Darade) यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा मारला असता जवळपास ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.याप्रकरणी दोघा जणांवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात (At the rural police station of Beed) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून बीडजवळ बनावट ऑईलचे सुरु असलेले रॅकेट उद्धवस्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 
    बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईसाठी एसपींने आदेश दिले आहेत.तसेच बाळराजे दराडे यांच्यावर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे असल्यास थेट कारवाई करण्यासाठी विशेष पथकाचे अधिकार त्यांना देण्यात आले.त्यामुळे बीड शहराजवळ असणाऱ्या काकडहिरा शिवारातील जिओ पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस बनावट ऑईलची विक्री (Sale of fake oil at back side of Jio petrol pump in Kakadhira Shivara) सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.त्यानुसार मंगळवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्यांनी बनावट ऑईल (fake oil) तयार करणाऱ्या ठिकाणी छापा मारला.यावेळी पोलिसांना टाटा मोटर्स,भारतबेंझ,गल्फचे बनावट रित्या तयार केलेले ऑईल आढळून आले.विशेष म्हणजे हे ऑईल तयार करण्यासाठी विविध मशीनरी,मोटर्ससह ३०० पोते युरिया घटनास्थळी दराडे यांना मिळून आला आहे.पोलिसांच्या या कारवाईत ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे मात्र अवैध धंद्यावाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे,एपीआय,राठोड,मोराळे,मुंडे,जायभाये,अलगट,राऊत,सानप,बडे,निर्धार यांचा समावेश होता. 

 

नामांकित कंपनीचे आढळून आले ऑईल  
काकडहिरा शिवारातील जिओ पेट्रोल पपांच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये भेसळयुक्त ऑईल तयार करण्याचा धंदा सुरु होता.यात टाटा मोटर्स,भारतबेंझ,गल्फचेच्या नावाखाली बनावट ऑईल तयार करण्यात येत होते.बाळराजे दराडे यांनी मारलेल्या छप्प्यात ३०० डब्बे जप्त करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
 

 

दराडेंच्या कारवाईची अवैध धंदयावाल्यांमध्ये दहशत 
बाळराजे दराडे बीड जिल्ह्यात दाखल होऊन जेमतेम दोन महिन्यांचा कालावधी झाला असेल.या अल्पकालावधीत त्यांनी गुटखा,मटका,दारू,जुगार,हवाला,वाळू तस्करी अन आता भेसळयुक्त ऑईलच्या साठ्यावर छापा मारून अवैध धंद्यामध्ये स्वतःच्या नावाची दहशत तयार केल्याचे चित्र आहे.बीड जिल्ह्यात दराडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज होती अशी भावना सामान्यांमधून व्यक्त होत आहे. 

 

बालेपीरमधील आरोपी
पोलिसांनी भेसळयुक्त ऑईलचा पर्दाफाश केला असून यावेळी दोघांना ताब्यात घेतले आहे.दोन्ही आरोपी शहरातील बालेपीर भागातील रहिवाशी आहेत.अफरोज दिलावर शेख (वय-३४) व समीर अरिफ शेख (वय-२१) असे त्या दोन आरोपींचे नाव असून कमी वयात ज्यादा पैशाच्या आमिषाने या दोघांनी या धंद्याकडे पाऊल टाकल्याचे कळते. 

 

Advertisement

Advertisement