मुंबई दि.१९ - राज्यात काल 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल लागले. यामध्ये अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्का बसला तर काही ठिकाणी अनपेक्षित असा निकाल लागला. मात्र कोणत्या पक्षाला किती ग्रांमपंचायत मिळाल्या याचा आकडा आता समोर आला आहे. ही आकडेवारी आजतकने दिली आहे.
शिवसेनेने 3113 ग्राम पंचायतींवर भगवा फडकवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक आमदार असलेला पक्ष भाजप आहे. भाजपने 2632 ग्राम पंचायतींवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने पहिल्या क्रमांकाचा दावा केला आहे मात्र त्यांच्या पारड्यात 1823 ग्राम पंचायती आल्या आहेत. तर महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 2400 ग्राम पंचायती मिळाल्या आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेला 36 ग्राम पंचायती मिळाल्या आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांना 2344 ग्राम पंचायती जिंकता आल्या आहेत.