बीड दि. १३(प्रतिनिधी) : विधान सभेसाठी केज राखीव मतदार संघातून रिपाइंचे उमेदवार म्हणून पप्पू कागदे हे देखील तयारी करीत असून त्यांनी कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बैठकीत दिले. तसेच केजची जागा महायुतीमध्ये रिपाइंला सोडवून घेण्या संदर्भात रामदास आठवले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
रामदास आठवले हे केंद्रात तिसऱ्यांदा मंत्री झाले असल्याने ५ ऑक्टोबर रोजी त्यांचा बीड येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. त्या निमित्ता गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी केज येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात सकाळी ११:०० वा. पप्पू कागदे यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्ष दिपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली.
यावेळी बोलताना पप्पू कागदे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सर्वांनी अंग झटकुन कामाला लागावे. तसेच कार्यकर्त्यांनी सर्व समाजात जावून आपण केलेल्या कामांची माहिती द्यावी, तसेच आपल्या ऐक्याची ताकद दाखवावी, चळवळीच्या माध्यमातून रिपाइं जिल्ह्यातील पाच हजार हेक्टर गायरान जमिनी कास्तकऱ्यांच्या नावावर केलेल्या आहेत. तसेच सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना विकास कामात मदत केलेली असल्याने आपण निवडणूक लढविण्यास हक्कदार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करा